ग्रामीण प्रतिनिधी दत्तात्रय शेळके
मनसे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके पाटील यांनी खाजगी क्षेत्रातील डॉक्टर बांधव वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे तसेच तसेच औषध विक्रेते सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती केली आहे की अंबड शहरातील रुग्णांना डिपॉझिट सक्ती केल्यास गुन्हे दाखल करू असे आवाहन डॉक्टरांना केले आहे .
कारण आजच्या कठीण प्रसंगात आपल्यापैकी अनेकजण अविरतपणे सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत त्यांना आमचा सलाम परंतु काही जण मात्र पैसा मिळविण्यासाठी काम करू लागलेत कोरूना च्या संक्रमणात अडकलेला रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अक्षरशः रडत आहेत इतके पैसे आणायचे कुठून आणि पैसे उपलब्ध झाले नाही तर माणसं मरू द्यायची का याआधी कधीच झाली नसेल.
इतकी भयंकर अवस्था आज आपल्या सर्वांच्या समोर आहे हे चित्र अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक आहे डॉक्टर साहेब माणसं जगली पाहिजे पैसा आज नाहीतर उद्या कमावणार आहात तुम्ही परंतु आज ही वेळ नाही नवऱ्याला कोरूना झाला तर बायको मंगळसूत्र मोडून घरात आहे तेवढे दागिने मोडून उपचारासाठी पैसे उभा करत आहे म्हणून रुग्णांना डिपॉझिट शक्ती करूच नका.