Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्लाझ्मा व रक्तदान करत शिवरायांच्या पुण्यतिथी निमित्ताने दुर्ग सेवकांनी वाहिली शिवरायांना आदरांजली

Responsive Ad Here
 प्रतिनिधी                          


        कोरोणा विषाणुच्या पार्श्वभूमीवर सर्वच रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.रक्तासाठी व प्लाझ्मा साठी रुग्णांना वणवण भटकाव लागत आहे. या अडचणी वर मात करण्यासाठी सामाजिक  "स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराच्या" वतीने सोशल मीडिया  माध्यमातुन रक्तदान व प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दुर्गसेवकांनी शिवरायांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत प्लाझ्मा व रक्तदान करुन शिवरायांना आदराजंली वाहिली.


             स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवार "संवेदना" नावाने हा उपक्रम राबवत आहे.संवेदना उपक्रमा अंतर्गत च अनेक रुग्णांना प्लाझ्मा तसेच बेड ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.आज नाशिक येथील शुभम मेधने  शिवरायांनी शिकवलेल्या माणुसकीचा धर्म पाळत मुस्लिम भगिणीला प्लाझ्मा दान करत एक वेगळा आदर्श निर्माण केला.या उपक्रमात प्रविण भंडारे,विशाल जाधव,संदिप बर्शिले,प्रथमेश दारुणकर,गोरख कोटमे,ॠत्विक गोरे तसेच राजमुद्रा सोशल फाऊंडेशन, स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवार व संवेदना च्या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.