प्रतिनिधी एरंडोल गणेश महाजन
एरंडोल येथील पत्रकार रतीलाल पाटील ( देसले) व त्यांचे पुत्र सौरभ पाटील ( देसले ) हे आपल्या स्वतः च्या डिजिटल व्हॅन द्वारे एरंडोल शहरात फिरुन कोरोना जनजागृती करीत आहेत.
या उपक्रमासाठी रतीलाल पाटील ( देसले) यांना एरंडोल नगर पालिकेचे सहकार्य लाभत आहे.पहिल्या दिवशी शहरातील संताजी महाराज चौक या ठिकाणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या हस्ते सदर उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी माजी नगरसेवक डॉ.एन.डी.पाटील,रतीलाल पाटील,सौरभ पाटील हे उपस्थित होते.रतीलात पाटील यांनी सदर उपक्रम आपण समाजाचे देणे लागतो व त्यामुळे समाजासाठी जनजागृती करण्याचा विचार मनात आला व सदर उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. सदर उपक्रम पाटील हे निःशुल्क पद्धतीने राबवत आहेत.त्यांना पुत्र सौरभ पाटील व मित्र भुषण चौधरी हे सहकार्य करीत आहेत.
