संदीप मस्के प्रतिनिधी सिंदखेड राजा
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शहर च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले राज्यात रक्ताचा तुटवडा झाला आहे व मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सिंदखेड राजा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी सर्व समाजातील युवकांनी एकत्र येऊन रक्तदान केले.
या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी दलवी साहेब,तहसीलदार सुनील सावंत,पी आय सातव साहेब, बिराजदार मैडम,ॲड नाज़ेर काज़ी साहेब,सीतारामजी चौधरी,छगनदादा मेहेत्रे,बालू म्हस्के,योगेश म्हस्के,भिवसन ठाकरे,राजेंद्र अढाव,संदीप मेहेत्रे,शेख अजीम,राजेन्द्र अंभोरे,वैभव मिनासे, सतीश काळे, मंगेश खुरपे,हरिदास सोनुने,किशोर म्हस्के,दीपक भालेराव,गौतम उबाळे,मुकेश जाधव,शेख वसीम,नितिन चौधरी,आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमासाठी मनोजभाऊ कायंदे, सिद्धार्थजाधव , जगनभाऊ ठाकरे, उल्हासभुसारे,दिपक ठाकरे, कदीरकुरेशी ,उमेश इंगळे,कचरुजी भारस्कर, अशपाक पठाण,आदीनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आयोजक सिद्धार्थ महेशराव जाधव शहर अध्यक्ष भा. रा. काँ. यांनी सर्व रक्तदात्यांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
