Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हिवरखेड पोलिसांनी केला अवैध रेतीचा टिप्पर जप्त

Responsive Ad Here

हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारिया

          दिनांक 23 एप्रिल रोजी रात्री हिवरखेडचे ठाणेदार धीरज चव्हाण आणि त्यांचे सहकारी हे बेलखेड गावामध्ये पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की बेलखेड बस स्टँड जवळ  तेल्हारा येथून हिवरखेड कडे एक इसम टाटा कंपनीच्या टिप्पर मध्ये नदीमधील रेती चोरून घेऊन येत आहे. अशा खात्रीलायक बातमी वरून पोलिस सदर ठिकाणी पाळत ठेवून असताना तेल्हारा कडून हिवरखेड कडे टाटा 407 टिप्पर येताना दिसला म्हणून पोलिसांनी टिप्पर चालकास थांबण्याचा इशारा केला असता त्यामध्ये एक ब्रास रेती किंमत अंदाजे पाच हजार रुपयांची दिसून आले.

        म्हणून पोलिसांनी टिप्पर चालकास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक समाधान तायडे वय 45 राहणार रायखेड असे सांगितले. त्याला रेती परवाना बाबत विचारपूस केली असता त्याने रेती वाहतूक परवाना नसल्याचे सांगितले. त्यावरून सदर टिप्परची पंचांसमक्ष पाहणी करून पोलिसांनी टिप्पर क्रमांक एम एच 28 एबी 3763 आणि रेती असा एकूण दहा लक्ष पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हिवरखेड पोलीस स्टेशनला वाहन लावण्यात आले. आणि आरोपी अशोक  समाधान तायडे याला ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला एक दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली.