Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आडगाव राजा येथील व्यायाम शाळा गेली कुठे?

Responsive Ad Here

प्रतिनिधि 

                   व्यायामशाळा विकास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या व्यायामशाळेचा गैरवापर

                सिंदखेड राजा तालुक्यातील ऐतिहासिक आडगाव राजा येथे व्यायामशाळा विकास योजनेअंतर्गत व्यायाम शाळा खोल्यांचे बांधकाम करण्यात आले असुन सद्य परिस्थितीमध्ये एकही व्यायामशाळा चालु नाही. शासनाकडुन लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या व्यायामशाळेचा सर्रास  गैरवापर होतांना दिसुन येत आहे. 

    आडगावराजा येथिल व्यायामशाळा त्वरित खाली करुन देण्यात याव्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन दि.३० एप्रिल रोजी सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले. आडगाव राजा येथील व्यायामशाळा विकास योजनेअंतर्गत व्यायाम शाळा मंजूर करण्यात आली होती त्या मुळात च कागदावरच आहे व्यायाम शाळेच्या नावाखाली शासनाचे लाखो रुपयांचे  अनुदान हे व्यायाम शाळाच्या खोल्या बांधकामांसाठी दिले होते . पण व्यायाम शाळा कुठेच दिसत नाही.

              आडगावराजा येथिल व्यायामशाळा ज्या संस्थेच्या नावाने असेल त्या संबंधितांची  संबंधित  कायदेशीर चौकशी करून शासनाची फसवणूक केल्या या प्रकरणी त्यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात यावा असे न झाल्यास मनसेच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा या निवेदनामध्ये दिला आहे.

                  यावेळी  मनविसे जिल्हाध्यक्ष शिवदादा पुरंदरे,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अतिश राजे जाधव, तालुकाध्यक्ष निलेश देवरे,  परिवहन सेना  तालुका उपाध्यक्ष महेंद्र पवार, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अंकुश चव्हाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राधेश्याम बंगाळे, मनसे तालुका उपाध्यक्ष अभिजीत देशमुख,तालुका सचिव भागवत राजे जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.