जळगाव प्रतिनिधी
शेंदुर्णी तालुका जामनेर प्रतिनिधी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ सागर गरुड यांच्या वाढदिवसा निमित्त जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व त्यांच्या मित्र परिवाराने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आव्हानाला साथ देत सागर गरुड मित्र मंडळांनी शेंदुर्णी येथे माहेश्वरी मंगल कार्यालयात कोरोना नियमाचे पालन करीत ुरक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे . शुक्रवारी 30 एप्रिल रोजी सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत शिबिराची वेळ राहणार आहे. शिबिराचे उद्घाटन पहूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक राहुल खताळ करणार आहे कोरोना काळात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे तरुणांनी मोठ्या संख्येने पुढे येत रक्तदान करावे असे आवाहन सागर दादा गरुड मित्र मंडळाने केले आहे
.त्या नंतर नेरी गटात धान्य वितरण होणार आहे. तसेच जामनेर तालुक्यात विविध ठिकाणी सॅनिटायझर चे वाटप व मास्क चे वाटप सोशल डिस्टन पाळून होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे .