Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आरोग्यवर्धिनी सांभाळण्यास नारी शक्ती समर्थ

Responsive Ad Here

 हिवरखेड:-जितेश कारीया

             हिवरखेड आरोग्यवर्धिनी  केंद्राच्या खांद्यावर हिवरखेड शहर आणि परिसरातील जवळपास एक लक्ष नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असल्याने हे सर्वात महत्वाचे आरोग्य केंद्र मानले जाते. जनसंख्येच्या व्याप बघता हिवरखेड येथे अनेक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाची नितांत आवश्यकता आहे. ती मागणी अजून पूर्ण झालेली नाही

         तरीसुद्धा उपलब्ध असलेल्या तोकड्या सुविधांवर तारेवरची कसरत करीत डॉक्टर सौ. वैशाली ठाकरे आणि डॉक्टर कु. प्रियंका हिवराळे ह्या दोन्ही वैद्यकीय अधिकारी अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या काळात अविरतपणे आपल्या जिवाची पर्वा न करता समर्थपणे आरोग्यवर्धिनी केंद्राची धुरा सांभाळत आहेत. आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून रॅपिड एंटीजन टेस्ट,  rt-pcr टेस्ट अशा अत्यंत जोखमीच्या कामासह कोविड  लसीकरण, दैनंदिन ओपीडी, प्रसुती विभाग, आणि इतर सर्व कामे ह्या दोन्ही रणरागिनी आपल्या सहकारी परिचारिका, सिस्टर्स, आशा स्वयंसेविका, आणि  इतर सर्व आरोग्य कर्मचारी अशा अनेक महिला शक्तींच्या सोबतीने कुशलपणे पार पाडत आहेत. त्यात आता नव्यानेच आलेल्या डॉ. कु. स्नेहा सावंग यांची सुद्धा साथ मिळत आहे. हिवरखेड येथे आरोग्यवर्धिनी केंद्रात  फक्त महिला डॉक्टर्स असून इतर कर्मचाऱ्यांमध्ये ही पुरुषांची संख्या अत्यंत कमी आहे. सद्यस्थितीत  सर्वत्र कोरोनाचा ग्राफ वाढत असताना हिवरखेड परिसरात कोरोना रुग्णांची संख्या नगण्य असल्याने हिवरखेड परिसराची संपूर्ण आरोग्य व्यवस्था सांभाळण्यास जिजाऊ सावित्रीच्या लेकी च्या लेकी पूर्णपणे समर्थ आणि सज्ज आहेत ही बाब प्रकर्षाने समोर येत आहे.


                                                अखेर एमबीबीएस डॉक्टर मिळाल्या

        हिवरखेड आरोग्यवर्धिनी केंद्रात एमबीबीएस डॉक्टरची नितांत आवश्यकता होती. काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायत मध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एमबीबीएस डॉक्टर नियुक्तीचा आणि रुग्णवाहिकेचा विषय चांगलाच गाजला होता. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ. सुलभाताई दुतोंडे यांनी याबाबत वरिष्ठांना निवेदन दिलेले असल्याची माहिती मिळाली. दुसरीकडे अखिल भारतीय आणि आदर्श पत्रकार संघाच्या पत्रकार बांधवांनी अनेक बातम्याद्वारे  या विषयांना वाचा फोडली होती. वरिष्ठांना अनेक निवेदने सुद्धा दिलेली आहेत. अनेक वर्तमानपत्रांनी याबाबत वस्तुनिष्ठ वृत्त प्रकाशित केले होते. ह्या सर्वांची दखल घेत शेवटी कु स्नेहा सावंग ह्या  एमबीबीएस डॉक्टर ची शासनाने नियुक्ती केली त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अखिल भारतीय आणि आदर्श पत्रकार संघातर्फे नवनियुक्त डॉ स्नेहा सावंग यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संदीप इंगळे, राजेश पांडव, जितेश कारिया, सूरज चौबे, राहुल गिऱ्हे, अनिल कवळकार, अर्जुन खिरोडकार, धिरज बजाज इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.


                                                                 उर्वरित मागण्या ही पूर्ण व्हाव्यात

      शासनाने वरखेड आरोग्यवर्धिनी केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करावे तसेच हिवरखेड करिता कोव्हीशील्ड लसींचा कोटा वाढवून द्यावा आणि दोन 108 रुग्णवाहिका त्वरीत उपलब्ध करून द्याव्यात. आणि  आरोग्यवर्धिनी मधील उर्वरित रिक्त पदे त्वरित भरून द्यावीत अशी मागणी अनेक घटकांकडून वारंवार करण्यात येत आहे.