हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारिया
विकास मैदानात आईकुसुमाई किराणा दुकानाजवळ दिनांक ३० एप्रिल चैत्र संकट चतुर्थीच्या दिवशी गुरांढोराना चारापाणी वितरित करण्यात आला , माणूस आपल्या बुद्धीने आपली तहान भूक भागवितो परंतु जनावरांना बोलता येत नाही ते आपली तहान भूक कोणाला सांगतील या उद्देशाने राष्ट्र संत
तुकडोजी महाराज जयंती व आईकुसुमाई पुण्यतिथीचे औचित्य साधून हा वेगळा उपक्रम हिवरखेड येथिल खिरोडकार कुटूंबियांनि राबविला गावातील भटक्या गुरांढोराणा चारापाणी वितरित करण्यात आला यावेळी उपस्थित चिंतामण खिरोडकार, विठ्ठल गावंडे, अर्जुन खिरोडकार हे होते,
