जालना प्रतिनिधी दत्तात्रेय शेळके
जिल्ह्यातील 21 53 बांधकाम कामगाराचे पंधराशे रुपये अनुदान तात्काळ बँक खात्यात जमा करा अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन गीते यांनी माननीय उप आयुक्त साहेब बांधकाम कार्यालय जालना यांच्यामार्फत निवेदन देऊन माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे ब्रेकदिचेनअंतर्गत निर्बंध जाहीर करतानाच नोंदणीकृत बांधकाम मजुरांना पंधराशे रुपये ची मदत जाहीर केली होती परंतु जिल्ह्यातील 2153 बांधकाम कामगार या अनुदानापासून वंचित आहेत बांधकाम कामगारांना अद्याप अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने बांधकाम कामगारांमध्ये शासनाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे .
जाहीर केलेली टाळेबंदी हाताला नसलेले काम यामुळे बेरोजगार तरुण व्यापारी वर्ग व सर्व साधारण माणूस कोणाच्या काळात अतिशय डबघाईला आलेला आहेब्रेक दि चेन अंतर्गत लागू निर्बंधांमुळे बांधकाम कामगारांना काम मिळेना तरी मुख्यमंत्री साहेबांनी बांधकाम कामगार यांची रीतसर नोंद केलेल्या कामगारांना अनेक कार्यालयीन अडचणींना सामोरे जावे लागत आहे तरीही पंधराशे रुपये प्रत्येकी त्यांच्या बँक खात्यात वर्ग करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन गीते तालुकाध्यक्ष क्रस्ना खलसे तालुकाध्यक्ष विष्णु शिंदे शहराध्यक्ष बाळू जाधव संजय जराड सुंदरलाल बगिन वाल गणेश शिंदे कैलास खडके श्रीकांत राठोड राम कातकडे विलास घाटे रवी मदन शिवाजी पवार कृष्णा काटकर यांचे निवेदनावर सह्या आहेत
