Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी सुरू करण्यासाठी विविध संघटनेकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Responsive Ad Here

 प्रतिनिधी बुलढाणा

    मलकापूर : सध्या परिस्थिती कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णांची संख्या ही शहरासाठी चिंता वाढविणारी होत असताना, रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याच बरोबर रक्ताची आवश्यकता असल्यास एक प्रकारचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तपेढी असतानाही सद्यस्थितीत बंद अवस्थेत आहे. ती सुरू करण्यात यावी अशी मागणी चे निवेदन शहरातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, ओम शांती सेवा समिती, श्रीराम भक्त गण , श्रीराम प्रतिष्ठान, हनुमान सेना, जाणीव फाउंडेशन, माणुसकी फाउंडेशन आदी संघटनांतर्फे, धर्मवीर आखाडा अध्यक्ष कुणाल गायकवाड यांच्या उपस्थितीत  जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले.

      कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव दुसऱ्याला लाटेत झपाट्याने वाढता झाला त्याचबरोबर उपचारा संदर्भात अनेक गोष्टींचा तुटवडा सुद्धा झाला. अशा परिस्थितीत शहरातील या संघटनांनी पुढाकार घेत होईल तशी सेवा व सुविधा रुग्णांना प्राप्त करून देण्यामध्ये सक्रियता दर्शवली सध्या परिस्थिती सर्वत्र रुग्णांना रक्ताचा तुटवडा हा भासत आहे. व अशा परिस्थितीत उपजिल्हा रुग्णालय येथे रक्त संकलन सुविधा असणे गरजेचे आहे त्यामुळे रक्तसंकलन सुविधा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन करण्यात आले .