Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रिदा आफरीन फाऊंडेशन व जि.प.मराठी शाळा अंबाशी यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक शेख वहिद शेख हमीद यांचा सहपत्नीक सत्कार

Responsive Ad Here

प्रतिनिधी सज्जाद

       अंबाशी:- दि.३० एप्रिल रोजी पदवीधर शिक्षक शेख वहिद शेख हमीद सेवानिवृत्त झाले. त्याअनुषंगाने रिदा आफरीन फाऊंडेशन व जि.प. मराठी शाळा अंबाशी यांच्या सयूंक्त विद्यामाने शेख वहिद सर यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला. शेख वहिद सरांनी १९८६-८७ मध्ये दे.राजा हायस्कूलची शाखा असलेली जनता विद्यालय सिनगाव जहांगीर येथून पवित्र शिक्षक सेवा कार्याला सुरुवात केली. 

    तर डिसें १९८७ पासून बुलढाणा जिल्हा परिषद शाळा आडगाव राजा येथुन सुरुवात केली आणि आज त्यांच्या शासकीय सेवा कार्याला पूर्णविराम मिळत आहे. एकूण ३४ वर्षांची दीर्घ सेवा करून ते आज सेवानिवृत्त होत आहे. शेख सरांनी आडगाव राजा, जवळखेड, तेल्हारा, अंबाशी आदी ठिकाणी शिक्षक म्हणून उत्कृष्ट प्रकारे कामे केली. तसेच आमखेड, काटोडा, तोरणवाडा याठिकाणी  मुख्याध्यापक म्हणून आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली.


      तर आमखेड येथे मुख्याध्यापक असतांना त्यांनी प्राथमिक शाळेचे उच्च प्राथ. (मिडल) शाळेत रूपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी मुख्याध्यापक गोविंदा धनवटे व फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहसिन खा,न बिसमिल्ला खान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख साबीर, पंजाबराव देशमुख, सहाय्यक शिक्षक राजेंद्र वायाळ, सुधाकर सोळंकी, जगन्नाथ सोळंकी, राजू लहाने, रमेश मापारी, जगन्नाथ घाटे, आदींच्या हस्ते साडी, कपडे, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, देऊन त्यांचे सहपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, शेख शाहिद, डॉ. अर्शद, नंदकिशोर शेजुळ, सामाजिक कार्यकर्ते मो.अजहर, शुभम आदी उपस्थित होते.