प्रतिनिधी
कोरोना आजाराने गेल्या वर्षभरापासून देशात एवढे थैमान माजले आहे की दवाखान्यामध्ये बॅड ऑक्सिजन ब्लड कमी पडत आहे मृत्यूदर प्रमाण भरपूर प्रमाणात वाढले आहे तसेच देशाची आरोग्य व्यवस्था ढासळत असल्याची परिस्थिती समोर आहे जनतेचे अतोनात हाल होत असल्याचे दिसत आहे अनेक गोष्टीचा तुटवडा आपण पाहत आहोत विविध सामाजिक संघटना व जागरूक नागरिक आपापल्या परीने तो भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी गोविंड सेंटर उघडले गेले आहेत सर्वसामान्यांसाठी शासनाने खासगी हॉस्पिटल सेंटरची परवानगी दिली आहे.
मात्र तेथे सध्या रुग्णांची लूट व मनमानी अधिक चार्जेस आकारले जात आहेत जनरल वार्ड साठी साडेचार हजार ते सात हजार आय सी यु साठी नऊ ते दहा हजार हा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही सरकारने जनरल वार्ड अर्ध्या किमतीत दोन ते तीन हजार अशा पद्धतीने खर्च घ्यावीत जेणेकरून तो सर्वसामान्यांना परवडेल मेडिकल साठी लागणारा खर्च सुद्धा एक मर्यादा आखून घ्यावी जेणेकरून सर्वसामान्यांच्या खिशात कात्री लागणार नाही.
व आर्थिक ताण येणार नाही व योग्य पद्धतीने विलाज होईल अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे विभागीय उपाध्यक्ष दीपक डोके तसेच कोरोना रुग्णाचे नातेवाईक यांच्याकडून करण्यात येत आहे अन्यथा या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना घेराव घालून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.