Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आरोग्यवर्धिनी, हिवरखेड येथिल कोविड १९ लसीकरणबाबत सहकार्य करा - डॉ. आनंद भराटे

Responsive Ad Here

        

हिवरखेड (प्रतिनिधी) जितेश कारीया

    आरोग्यवर्धिनी हिवरखेड येथे काही दिवसांपूर्वी कोविड १९ लसीकरण सुरू करण्यात आले असून कोविड १९ लसीचा तुटवडा येत असल्यामुळे हजर नागरिकांना तो अपूर्ण पडत आहे त्यामुळे अनेक नागरिकांना लसीसाठी आरोग्यवर्धनी येथे वारंवार यावे लागते आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने हिवरखेड येथे लसीचे डोज वाढवून दयावेत अशी मागणी नागरिकांनकडून होत आहे.

   हिवरखेड आरोग्यवर्धनि येथे जवळपास ५०% कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यामुळे ५०% कर्मचारी असल्यामुळे कोविड १९ लसीकरण व सोबतच दैनंदिन ओपीडी यासाठी स्टाफ कमी पडत असल्यामुळे ग्रामपंचायतीने आपले कर्मचारी दयावेत तसेच लसीकरण ठिकाणी क्रमांकासाठी कोणताही वाद होऊ नये यासाठी ठाणेदारांनी सुद्धा निदान दोन पोलीस कर्मचारी देण्याची मागणी होत आहे जेणेकरून आरोग्यवर्धनि येथे लसीकरण दरम्यात होत असलेल्या धांदल्या थांबतील.

     वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद बराटे व डॉ.कु. स्नेहा सावंग यांनी या लसीकरण मोहिमेत आरोग्यवर्धीनीला प्राप्त झालेल्या लसीमधील दुसरी डोज ज्यांचा राहिला असेल त्यांना ७० टक्के तर पहिल्या लसीसाठी ३० टक्के डोज दिले जाईल. तसेच शासनाच्या निर्देशानुसार १८ ते ४५ वयोगटातील सद्यस्थितीत आरोग्यवर्धिनी येथे लसीकरण होणार नाही, हे स्पष्ट करून लसीकरणामोहिमेत सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.