Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वडीगोद्री येथे अँटीजन टेस्ट कॅम्प

Responsive Ad Here

अंबड तालुका प्रतिनिधी भिमराव हारे

         कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विशेष काळजी म्हणून अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत पंचक्रोशीतील ग्रामस्थांची अँटीजन चाचणी कॅम्प दि.२१ मे रोजी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखाली आयोजित करण्यात आला होता.

 तसेच यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वडीगोद्री येथे १०१,मुरमा फाटा येथील चेकपोस्टवर ७२,शहापूर येथे ८ अशी एकूण १८१ नागरिकांची अँटीजन चाचणी करण्यात आली.यात ४ कोरोना पोसिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये धाकधूकी वाढली असून त्यांच्यावर वैद्यकीय सल्ल्याने वेळीच उपचार होत आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ज्यांना सर्दी,ताप,अंगदुखी,डोळे लाल होणे असे लक्षण आढळून येत असतील अशा रुग्णांनी कोरोना अँटीजन तपासणी करून घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

   तसेच रेणापूरी येथे ३८,टाका येथे २३ तर अंतरवाली सराटी येथे १० अशा एकूण ७१ आरटीपीसीआर करण्यात आल्या.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन लागू केला आहे.लॉकडाउन काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांनी घरीच बसावे,नियमांचे पालन करावे तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये.जास्त संख्येने रस्त्यावर जमा होऊ नये.तसेच एसबीआय,ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यासह विविध पतसंस्थामध्ये आलेल्या ग्राहकांनी कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स पाळत नाही.यातून रुग्णांची संख्या वाढू शकते.या उद्देशाने अशा नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

  कोरोना पोसिटीव्ह आलेल्या या ४ रुग्णांना पुढील उपचारासाठी अंबड येथील कोविड सेन्टरला रवानगी करण्यात आली.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशील जावळे,आरोग्य कर्मचारी योगेश बळी अर्षद शेख,विष्णू मिसाळ,कैलास वराडे तसेच पोलीस कर्मचारी कंटूले व परदेशी यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाउन व संचारबंदी लागू केली आहे.त्यामुळे नागरिकांना विनाकारण फिरण्यास बंदी आहे.तरी नागरिक विनाकारण फिरत आहे.त्यामुळे कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे.तरी नागरिकांनी ताप,सर्दी,खोकला आदी लक्षणे दिसू लागली की लगेच अँटीजन चाचणी करून घ्यावी.तसेच खाजगी डॉक्टरानी  अँटीजन टेस्टिंग केल्या शिवाय रुग्ण भरती करू नये...डॉ.सुशील जावळे,वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र,वडीगोद्री