Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एकाचा मृत्यू तर दुसर्‍याला जीवनदान

Responsive Ad Here

प्रतिनिधी प्रदीप रघुते अमरावती

  चाळीस फुट खोल विहिरीत पडले नीलगाय अमरावती वनविभागाच्या रेस्क्यू टीम ची उत्तम कामगगिरी

   नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील सालोड  गावांतील श्रीधर इंझळकर यांनी आपल्या शेतात मागच्या वर्षी विहिरीचे खोदकाम केले होते त्यामुळे त्या विहिरीचे बांधकाम व्हायचे असल्याने जमिनीच्या खाली नुसता 40 फुट खोल विहिरीचा खड्डा झाला आहे.  अशातच 13 मे रोजी दोन नीलगाय विहिरीत पडल्याची घटना घडली. सकाळी श्रीधर इंझळकर यांच्या शेतात  नांगरणी करते वेळी विहिरीत दोन नीलगाय असल्याचे दिसून आले त्यापैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता अशा परिस्थितीत मात्र गावांतील काही लोकांच्या मदतीने व अमरावती येथील वनविभागाच्या रेस्क्यू टीम च्या अथक प्रयत्नाने नीलगायीचा रेस्क्यू करून  एकाला जिवंत विहिरीच्या बाहेर काढून जंगलात सोडण्यात आले. तर एका मृत नीलगाय तिला जंगलात माती देऊन अत्यसंस्कर करण्यात आले

   यावेळी अमरावती वनविभाग रेस्क्यू टीम चे सहभागी कर्मचारी वनपाल सुरेश मनगटे,वनरक्षक अमोल गावनेर, वनरक्षक मनोज माहुलकर, वनरक्षक सुधीर काळपांडे , वनमजूर सतीश उमक , वनमजूर मनोज ठाकुर यांच्यासह सालोड येथील , पंकज इंझळकर, किरण इंझळकर,कुंदन राऊत, धनराज इंझळकर, राहुल नेवारे, राहुल वरखड, अंकुश निमनेकर , सूरज काळपांडे यांनी अधिक परिश्रम घेतले.