Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

त्या काळ्या माकडाचा अखेर सुरक्षितरित्या बंदोबस्त

Responsive Ad Here

    जितेश कारीया प्रतिनिधी हिवरखेड                        


     भुलीचे औषधाने रेस्क्यू करून मेळघाट वान परिक्षेत्रात सुरक्षितरित्या सोडण्यात आले

  मागील दोन महिन्यांपासून हिवरखेड परिसरात दहशत पसरविणार्‍या "त्या" काळ्या माकडाचा बंदोबस्त करण्यात अखेर वनविभागाला यश आले. त्याला बेशुद्ध करून सुरक्षितरित्या मेळघाट मध्ये सोडण्यात आल्याने हिवरखेड वासीयांनी सुटकेचा श्वास सोडला.

   हिवरखेड येथील चौताळलेले वन्यप्राणी काळतोंडे माकडाने गावातील तीन ते चार लोकांना चावा घेऊन जखमी केले होते. त्यामुळे दि.16, 17, 18 असे सलग तीन दिवस अकोला वनविभागांतर्गत अकोट वर्तुळ क्षेत्रातील अजय एन. बावणे, वन परिमंडळ अधिकारी अकोट यांचे अधिनस्त वनकर्मचारी  सि. एम. तायडे वनरक्षक बोर्डी, ए. पि. श्रीनाथ वनरक्षक शहानुर, विकास मोरे, सोपान रेळे,  राहुल बावणे, दीपक मेसरे अकोट वर्तुळ वनकर्मचारी यांनी सलग तीन दिवस हिवरखेड येथील चौताळलेल्या काळ्या माकडास पिंजऱ्यात सुरक्षित रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला असता त्याला त्यावेळी पिंजऱ्यात रेस्क्यू करण्यात यश आले नाही.

       त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांचे सल्ल्यानुसार अमोल गावणेर वनरक्षक रेपीड रेस्क्यू टीम अमरावती यांनी त्यांचे टिमने दि. 19/05/2021 रोजी दांदळे पशुधन विकास अधिकारी तेल्हारा यांचे मार्गदर्शनाने चौताळलेले वन्यप्राणी माकडास डाट देऊन बेशुद्ध करून रेस्क्यू केले. व मेळघाट वन्यजीव अभयारण्य मधील वाण परिक्षेत्रातील बफर झोन क्षेत्रात सुरक्षित सोडण्यात आले.

  उपरोक्त कार्यवाही के. आर. अर्जुना उपवनसंरक्षक अकोला वनविभाग अकोला व सु. अ. वडोदे सहाय्यक वनसंरक्षक (वने) यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत विरोधीपक्षनेते श्री गजानन बंड , प्रगतिशील शेतकरी सोपान पाटील वाकोडे, आदर्श पत्रकार संघ आणि अनेक स्थानिक नागरिकांचे सहकार्य वनविभागाला मिळाले.