जितेश कारिया प्रतिनिधी हिवरखेड
भाविकांच्या भक्ती समोर सर्व बंधने तुटतात
हिवरखेड येथील भक्तांना श्री अवलिया रामचंद्र महाराज यांच्या दुःखाची बातमी कडताच भाविकांन मध्ये नाराजी पसरली दिनांक १७ मैं च्या रात्री १ वाजता संत रामचंद्र महाराज हे अंतात विलीन झाल्याची माहिती शोशल मीडियावर व्हायरल होताच सर्व भाविक सकाळी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी निघाले हिवरखेड मधील सुद्धा भाविकांनि सकाळीच महाराजांच्या अंत यात्रेत वझेगावला जाऊन हजेरी लावली व शेवटीची आराधना केली, काही भाविकांनि तर महाराज तुम्ही या परत , आम्हा सोडून कुठं चालले असे मनोगत व्यक्त केले,
महाराजांच्या अंत यात्रेत भाविकांचा आरोह आवरत नव्हता , महाराजांच्या जाण्याने अनेक भाविकांनवर दुःखाचा डॉगर गरजला, रामचंद्र महाराजांना त्याच्या आई वडिलांच्या समाधी बाजूलाच समाधी देण्यात आली, तसेच काही भाविक म्हणाले महाराज हा कोरोना नष्ट करा सर्व जैसे तैसे करा, महाराज तुम्ही जिवीतच आहात व अमर आहात असे भाविकांचे वाक्य या जनसमुदायात आयकायला मिळाले, महाराजांचा पोलीस बंदोबस्तात भाविकांच्या उपस्थित सर्वानि हिंदू संस्कृतीचे आरती गाऊन श्रद्धांजली वाहिली.
