Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कोरोना काळात युवकांनी केले उस्फुर्त पणे रक्तदान.शिव सन्मान प्रतिष्ठान वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित

Responsive Ad Here

जळगाव प्रतिनिधी

        पाळधी ता. जामनेर येथील शिवसन्मान प्रतिष्ठान यांनी वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पहूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ व ईश्वर चोरडिया यांनी स्वतः रक्तदान करीत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी गावातील युवक रक्तदात्यांनी देखील उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.

      कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने शिव सन्मान प्रतिष्ठान यांनी शासनाच्या आवाहन प्रतिसाद देत वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर घेण्याचे नियोजन करीत ते यशस्वी पने पार पडले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवसन्मान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वजीत पाटील, डॉ वैभव पाटील, निळू आबा पाटील, हितेश जैन, संदीप पाटील, वैभव पाटील, अजय बडगुजर, स्वप्नील पाटील, मुकेश जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

    रक्तदान शिबिरासाठी जळगाव रेडक्रॉस ब्लड बँकेचे व माणुसकी रुग्णसेवा समूह, कल्प मूळ बहुद्देशीय संस्था आणि इतर गावकरी मंडळी यांचे सहकार्य लाभले.