Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर नांदुरा येथील 'ग्रुप युवा' च्या वतीने रक्तदान शिबिर यशस्वीपणे संपन्न

Responsive Ad Here

प्रतिनिधी तालुका देवानंद नेमाने

      व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वांत मोठा दानधर्म म्हणजे रक्तदान होय. आजच्या धावपळीच्या काळामध्ये जीवनात कधी काय होईल याची श्वाश्वती देता येत नाही. विविध केसेसमध्ये रुग्णांना रक्त चढवावं लागतं. काही रुग्णांचा वेळीच रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूही होतो. तसेच पुढे कोरोना लसीकरणाची पार्श्वभूमी लक्षात घेता रक्ताचा तुटवडा जाणवु शकतो हा दूरदृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवुन नांदुरा येथील  'ग्रुप युवा' च्या वतीने आज रविवार, दि. ०२/०५/२०२१ रोजी नांदुरा अर्बन बँक सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

             आज कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुद्धा रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. तसेच येत्या काही दिवसातच १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात होत असून लसीकरणानंतर नागरिकांना ६० दिवस रक्तदान करता येणार नाही. या परिस्थितीतून सावरण्यासाठी व सामाजिक जबाबदारी म्हणून एक पाऊल 'ग्रुप युवा' या नांदुरा शहरातील तरुणांच्या ग्रुपने या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून उचलले.  'ग्रुप युवा' च्या या आवाहनाला प्रतिसाद देत व 'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ या उक्तीनुसार शिबिराला नांदुरा शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यंत उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. आज त्यापैकी १०० व्यक्तींनी रक्तदान केले असून उर्वरित व्यक्तींचे रक्तसंकलन हे पुढील रक्तदार शिबिरात करण्याचा संकल्प ग्रुप युवाच्या वतीने यावेळी करण्यात आला. या शिबिरामध्ये रक्तसंकलन डॉ. हेडगेवार रक्तपेढी, अकोला यांच्याकडून करण्यात आले.

      काळाची गरज ओळखून रक्तदात्यांनी रक्तदान करून दाखविलेल्या या समाजऋणाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. आयोजक 'ग्रुप युवा' च्या वतीने रक्तदात्यांना सन्मानपत्रे व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.*सदर रक्तदान शिबिर हे विशेष डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने व सर्व प्रतिबंधनात्मक उपाययोजनांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करून यशस्वीरीत्या संपन्न झाले.