प्रतिनिधी
पहूर येथे सुरु असलेल्या जुगार अड्यांवरून चोरीच्या १५ ते २० मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून एका संशयीतास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे .
याबाबत अधिक माहीती अशी की , लॉक डाऊन काळातही पहूर परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरु आहेत . या जुगार अड्यांवर छापे मारत चोरीच्या सुमारे १५ ते २० मोटर सायकली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या . या प्रकरणी पिंपळगांव कमानी येथील एका संशयीतास ताब्यात घेण्यात आले आहे . जप्त केलेल्या मोटर सायकली आणि संशयीतास जळगांवला रवाना करण्यात आले .
