Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

काँग्रेसचे अभ्यासू नेते व खासदार राजीव सातव यांचं पुण्यात दुःखद निधन

Responsive Ad Here

   प्रतिनिधी जळगाव  

   महाराष्ट्राच्या राजकारणातील काँग्रेसचा एक उमदा नेता व खासदार राजीव सातव यांचे न्युमोनियाच्या संसर्गाने आज दुःखद निधन झाले आहे. . गेल्या 23 दिवसांपासून राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज सुरु होती. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राजीव सातव यांच्या निधनाची बातमी दिली.

                      राजीव सातव यांचा प्रवास 

राजीव सातव यांचा जर प्रवास पाहिला तर सामान्य कार्यकर्त्यापासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी त्यानंतर पक्षानं दिलेलं महाराष्ट्र युवक काँग्रेसचं अध्यक्षपद.


    तसेच दोन वेळा खासदारकी आणि काँग्रेस पक्षाची सर्वोच्च वर्किंग कमिटीचे ते सदस्य होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तींयांपैकी ते एक होते. काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये तसेच गेल्या काही वर्षांच्या काँग्रेसच्या प्रवासात राजीव सातव यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.दरम्यान राजीव सातव यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी लाटेतही विजय मिळवला होता.