देवानंद नेमाने प्रतिनिधी तालुका
चिखली तालुक्यातील चांधई येथिल धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच परिसरातील नागरीकांच्या घरी धार्मिक विधी, पुजाअर्चा करणारे सोमवारगिर गिरी महाराज यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे उपचारादरम्यान दु:खद निधन झाले. गांवात व परिसरात धार्मिक़ सप्ताहाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून समाज बांधीलकीचे कार्य करणे, विवाहसोहळ्यात पूजा विधीसाठी निस्वार्थपणे सेवा करणे, ग्राम पंचायत असो, कि गावातील कोणतेही सामाजिक कार्य असो त्यात स्व.गिरी महाराज सहभागी होवून मदत करीत असत. अशा विविध सामाजीक क्षेत्रात काय करत असतांना व मदत करीत असतांना सोमवारगिर गिरी महाराजांचे उपचारादरम्यान दु:खद निधन झाले.
त्यांच्या या सेवाभावी संस्काराचा, विचारांचा वारसा चालवित असतांना परिवारातील सदस्यांनी गिरी महाराजांच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशी पुढील कार्यक्रमावर कोणताही अतिरिक्त खर्च न करता, कोरोनाच्या काळात सर्वांना मदतीचा हात देवून सहकार्य करणारे राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरेसाहेब यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 11 हजाराची मदत केली आहे. सदर मदतीचा धनादेश शिवसेना नेते नंदू कर्हाडे यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर सदर धनादेश चिखलीचे तहसिदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये हा धनादेश जमा करण्यात आला आहे.
यावेळी युवा सेना तालुका प्रमुख नंदु कर्हाडे, शिवसेना शहर संघटक प्रितम गैची, सरपंच सुनिल रगड, पप्पु परिहार हे उपस्थित होते.
