संदीप म्हस्के प्रतिनिधी देऊळगावराजा
कालकथीत ॲड .प्रा .मुकुंदजी खैरे ,त्यांच्या पत्नी व मुलगी ॲड .शताब्दी खैरे या एकाच कुटुम्बातील तिघांचे कोरोना मुळे दुःखद निधन झाले . खैरे सरांचे उभे आयुष्य फुले आम्बेडकरी चळवळीमधे गेले .त्यांनी सम्पूर्ण राज्यभर अनेक अन्यायग्रस्त लोकांचे प्रश्न हाताळून त्यांना न्याय मिळवून दिला .
विशेष बाब म्हणजे अधिकारी वर्गाशी ते अन्यायग्रस्त व्यक्तीची बाजू मांडताना अतिशय व्यवस्थित ,कायदेशीर परंतु आक्रमकपणे मांडत असत .त्यामुळे अधिकारी कोणत्याही पट्टीतला असला तरी त्याला झूकावेच लागायचे .
4 ते 5 वेळा सरांची व माझी भेट झाली .अतिशय प्रेमळ ,नीगर्वी ,अभ्यासू व झुंजार नेत्याला महाराष्ट मुकला आहे .त्यातल्या त्यात अवघ्या 10 दिवसामधे सर ,त्यांची पत्नी व लाडकी मुलगी यांचे निधन म्हणजे निसर्गाने केलेली अतिशय क्रूर थट्टा असेच म्हणावे लागेल . बहुजन संघर्ष सेना व माझ्या जाधव परिवारातर्फे ह्रुदयपूर्वक ,जडअंतकरनाने सराणा तसेच त्यांची पत्नी व मुलगी यांना " भावपूर्ण श्रद्धांजली ." एवढ्या भयंकर दूखातून त्यांच्या कुटुम्बियांना सावरण्याची " तथागत " शक्ति प्रदान करो हिच विनम्र प्रार्थना .
