Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

से.नि .ग्रंथालय संचालक कालकथीत ग. जा.तायडे साहेब यांचे दुःखद निधन

Responsive Ad Here

   प्रतिनिधी देऊळगाव राजा संदीप मस्के

      कालकथीत ग. जा.तायडे साहेब से.नि .ग्रंथालय संचालक यांचे दुःखद निधन ही बातमी मन सुन्न करणारी आहे .ते बुलडाणा येथे जिल्हा ग्रंथपाल या पदावर कार्यरत असताना डॉ .बाबासाहेब आम्बेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात त्यांनी 101 नवीन ग्रंथालये सुरू करून त्यांना शासन मान्यता मिळवून दिली होती . " बहुजन संघर्ष सेनेच्या " 1 जानेवारी 2017 च्या संघटना स्थापीत करण्याच्या कार्यक्रमाचे ते प्रमुख अतिथि होते .

     तसेच मी लोकदूत या दैनिक व्रूत्तपत्रासाठी पत्रकारीता करीत असताना पदवी धर अंशकालीन कर्मचारी म्हणुन शासकीय ग्रंथालय बुलडाणा येथे ते ग्रंथपाल असतांना मला त्यांचे सोबत काम करण्याची संधी मिळाली .तसेच त्याच दरम्यान त्यांच्या पुढाकाराने त्यावेळी नगर पालिका शाळा क्र .2 येथे डॉ .बाबासाहेब आम्बेडकर यांचे स्वीय सहायक नानकचंदजी रत्तू यांचे सत्काराचा भव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता .सैलानी सारख्या दुर्मिळ भागात पीम्पळगाव सराई येथे त्यांनी वसतिगृह व वाचनालय सुरू करून त्यांनी गरजू मुलांची निवास व अभ्यासाची व्यवस्था केलेली आहे .

      अशा प्रकारे चळवळीचे भान आणी सामाजीक बांधीलकी असलेले एक अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले का .क . तायडे साहेब यांना बहुजन संघर्ष सेना व माझ्या जाधव परिवारातर्फे " ह्रुदयपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली ."