Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग.स. सोसायटीचा मदतनिधी मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

Responsive Ad Here

जळगाव प्रतिनिधी               

 ना. गुलाबराव पाटील यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत दिला धनादेश !

   जळगाव येथील सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स. सोसायटीतर्फे कोरोनाच्या प्रतिकारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जाहीर करण्यात आलेल्या ११ लाख ११हजार १११ रूपयांच्या मदतीचा निधी ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांना सुपूर्द केला.

   याबाबत वृत्त असे की, गेल्या महिन्याच्या अखेरीस ग. स. सोसायटी जळगावतर्फे कोविडच्या प्रतिकारासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना प्रदान केला होता. ग. स. सोसायटीचे चेअरमन मनोज पाटील, उपाध्यक्ष सुनील पाटील, संचालक तुकाराम बोरोले, विलास नेरकर, एन.एस. पाटील आदी मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती.


     याच मदतीचा धनादेश ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, परिवहन मंत्री अनिल परब आदी मान्यवरांची उपस्थिती होती.