गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल येथे दिनांक 26 जून 2021 रोजी सकाळी 11:00 वा. धरणगाव चौफुली एरंडोल येथे तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी चारही बाजूंनी वाहनांची रांग लागली होती.याप्रसंगी बोलतांना भाजपा ओ.बी.सी.सेल मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असल्याचा आरोप केला तसेच सर्व ओबीसी बांधवांचा विश्वासघात या महाराष्ट्रातील आघाडी सरकारने केला असल्याचे सांगून हे आरक्षण पूर्ववत लागू करावे व ओबीसी बांधवांना न्याय मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टी एरंडोल तालुका तर्फे सदर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी श्री. रमेशभैय्या परदेशी नगराध्यक्ष न.पा. एरंडोल, रवींद्र महाजन माजी नगराध्यक्ष ,अमोल जाधव ,राजेंद्र पाटील तालुका सरचिटणीस , ॲड.नितीन महाजन,डॉ.नरेंद्र पाटील,डॉ.नंदलाल सोनार, उद्योग आघाडीमाजी जिल्हाध्यक्ष सचिन सोनार,वाल्मीक सोनवणे,प्रशांत महाजन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष, लोकेश महाले प्रदीप पाटील विकास सोनवणे, सरपंच खडके,मयूर वाणी,जितेंद्र महाजन,शुभम राजपूत,अनिल महाजन तसेच एरंडोल तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रिनिधी, महिला आघाडी, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.
