गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल येथील शास्त्री इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसीच्या सामाजिक कार्याबद्दल तसेच मिसेस इंडिया २०२१ या स्पर्धेच्या अंतीम फेरीत निवडीबद्दल राष्ट्रीय नारी सशक्तीकरण संघ नवी दिल्ली या संस्थेर्फे शास्त्री फाऊंडेशनच्या संस्थापक सचिव रुपा विजय शास्त्री यांना नारीरत्न सन्मान देवून गौरविण्यात आले . शास्त्री फाऊंडेशन तर्फे रुपा शास्त्री यानी ग्रामीण भागात महिलांमध्ये सॅनीटरी नॅपकीन वापराबाबत व महिलांच्या आरोग्याबाबत जागृती केली . त्याचबरोबर दरवर्षी त्यांची संस्था एक गाव दत्तक घेऊन तेथील स्त्रियांना सॅनीटरी नॅपकीनचे मोफत वाटप केले जाते.सदरील कामात त्यांचे पती व शास्त्री इन्स्टिट्युट चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विजय शास्त्री यांचे मार्गदर्शन लाभत असते. याशिवाय त्यांचे जगातील फॅशन मॅगझिन 'मिनी एन मोर ' च्या कव्हर पेज स्पर्धेसाठी फायनल
लिस्ट आहेत.भारतीय सौंदर्यवती पुरस्कारासाठी त्या प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रीत होत्या.ताज इव्हेंट स ब्युटी काँटे स्ट साठी त्यांची ऑडिशन ज्युरी म्हणुन निवड झाली आहे.अनेक सामाजिक कार्यातही रुपा शास्त्री यांचा मोलाचा वाटा असतो . त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.त्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विजय शास्त्री यांचे मार्गदर्शन लाभते .
