Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचा २६ जूनला चक्काजाम आंदोलन

Responsive Ad Here

जळगाव प्रतिनिधी

 

    खा.रक्षाताई खडसेंच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भाजपा नंदुरबार जिल्ह्याची बैठक

    स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी भाजपा महाराष्ट्र तर्फे दि.२६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करून कारणीभूत राज्य सरकारलाचा निषेध करण्यासंदर्भात आज भाजपा नंदुरबार जिल्ह्याची रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यसमितीची बैठक तळोदा जि.नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली होती. 

      ओबीसी समाजास पुन्हा राजकीय आरक्षण मिळणे संदर्भात करण्यात येणाऱ्या चक्काजाम आंदोलना विषयी खासदार रक्षाताई खडसे, खासदार हिनाताई गावीत, आमदार राजेश पाडवी व जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांचे कडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ओबीसी समाजासाठी सर्व समाजातील व्यक्तींनी एकत्र येऊन चक्काजाम आंदोलनात सहभागी होऊन ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

    यावेळी कार्यसमितीची बैठकीस खासदार रक्षाताई खडसे, खासदार हिनाताई गावीत, भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी, आमदार राजेश पाडवी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अजयभाऊ, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व भाजपा तालुकाध्यक्ष, महिला आघाडी अध्यक्षा यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील सर्व भाजपा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.