Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Responsive Ad Here

  गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हॉटेल पांडव जवळ एरंडोल कडून पारोळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरुन येणाऱ्या मोटासायकलस्वारास धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ठीक साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.

       याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.१० जुन रोजी धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील अनिल ज्ञानेश्वर मराठे (वय २२) हा तरुण आपली दुचाकी क्र.एम.एच.१९ डी.आर.३९४९ ने भालगाव मार्गे एरंडोल येथे शेतीसाठी बियाणे खरेदी करण्यासाठी येत होता.त्याच्या दुचाकीला एरंडोल कडून येणाऱ्या ट्रक क्र.एम.पी.२० एच.बी.६०३९ वरील चालकाने भरधाव ट्रक चालवत समोरुन जोरदार धडक दिली.या धडकेत अनिल हा ट्रकच्या पुढील चाकात आल्याने काही अंतर फरफटत गेला.त्याला मागुन येणाऱ्या अनीलचा चुलत भाऊ किशोर मराठे व महेश मराठे यांनी जवळ जावून बघितले असता तो काही एक हालचाल करीत नव्हता.त्याच्या डोक्याला व चेहऱ्यावर जबर मार लागून रक्त निघत होते.त्यावेळी किशोर मराठे व महेश मराठे यांनी लोकांच्या मदतीने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.त्यास डॉक्टरांनी मयत घोषित केले.ट्रक चालक ट्रक सोडुन फरार झाला आहे.त्याचे विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला किशोर मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र तायडे,पंकज पाटील,विकास खैरनार व संतोष चौधरी तपास करीत आहेत.

      अनिल चे वडील ज्ञानेश्वर मराठे हे रिक्षा चालक असुन आई शेतीकाम करते. भाऊ पुण्यात एका कंपनीत कामाला              आहे. अनिल हा एरंडोल येथील                  डी.डी.एस.पी.महाविद्यालयातील आय. टी.आय .च्या .डिझेल मकॅनिकल शिकत होता.