नाशिक येवला प्रतिनिधी माधव नेहे
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापाऱ्यांकडून त्रुटी दायक वजन काट्यांनऐवजी इलेक्ट्रॉनिक वजन काटे सक्तीचे करणे अनावश्यक वांदा बंद करणे व शेतमाल विक्रीची रक्कम रोखीने देण्याबाबत निवेदन देण्यात आले
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज हजारो शेतकरी बांधव त्यांचा विविध शेतमाल विक्रीसाठी आणता जसे की सोयाबीन ,गहू इत्यादी यांचा त्यात समावेश आहे शेतकरी बांधवांनी आणलेला शेतमाल नेहमीच्या लिलाव प्रक्रियेनंतर ज्या व्यापाऱ्याने माल खरेदी केलेला असतो त्याच्याकडे पारंपारिक जुने धडी काट्यांवर वजन माफ केले जाते. अशा काट्यांवर वजनाची अचूकता दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तंतोतंत वजन मिळत नाही.
वास्तविक माननीय पणन संचालक यांनी सर्व बाजार समित्यांना दिनांक 18 फेब्रुवारी 2014 रोजी च्या पत्रानुसार इलेक्ट्रॉनिक वजन काटे सक्तीचे करण्याबाबत आदेश पारित होऊनही आपल्या बाजार समितीने अद्याप कार्यवाही केलेली नाही ही बाब अत्यंत बेजबाबदार पणाची असून बाजार समिती ही शेतकऱ्यांची हितसंबंध जोपासणारी नसून व्यापाऱ्यांची बटिक बनल्याचं यातून अधोरेखित होत आहे.
तसेच मुख्य बाजार व विंचुर बाजार समितीत विक्री झालेल्या कांदा व शेतमालाचे वांदे मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून काही व्यापारी शेतमाल विक्रीचे पैसे रोख न देता शेतकऱ्यांची अडवणूक करत असून हे सर्व प्रकार आशिया खंडातील नावाजलेल्या बाजार समितीस नक्कीच भूषणावह नाही.
या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा प्रहार संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामाची जबाबदारी बाजार समिती ची राहील याची नोंद घ्यावी. असा इशारा प्रहार तर्फे लासलगाव बाजार समितीला देण्यात आले आहे या वेळी प्रहार शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे येवला तालुका प्रमुख अमोल फरताळे, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन ,तालुका संपर्क प्रमुख सचिन पवार ,किरण चरमळ, चांदवड तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण,शंकर गायके, जगदीश गायकवाड ,गणेश लोहकरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
