सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यात दिनांक २१/०६/२०२१ ते १/०७/२०२१ या कालावधीत कृषि विभाग तसेच आत्मा मार्फत कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सदरील सप्ताहाचा शुभारंभ टिटवी, हिवरी, नांदातांडा व सावळदबारा येथे करण्यात आला. सदरील सप्ताहाचे मोहीम स्वरूपात अंबलबजावणी करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी श्री. एस.जी.वाघ, मंडळ कृषि अधिकारी श्री. जे.के.जाधव तसेच कृषि पर्यवेक्षक श्री. ए.जे.पाटील यांचे मार्फत सावळदबारा मंडळातील १२ खेड्यांमध्ये नियोजन करण्यात आलेले आहे. यात प्रामुख्याने बी.बी.एफ तंत्रज्ञान लागवड, रासायनिक खत बचत मोहीम,एक गाव एक वाण लागवड, जैविक बिजप्रक्रिया, विकेल ते पिकेल, शेतीशाळा या घटकांचा समावेश आहे.
मौजे टिटवी येथे सोयाबीन बियाण्यास जैविक बिजप्रक्रिया प्रात्यक्षिकाबद्दल श्री. ए.एस.सुरडकर (कृषि सहाय्यक) यांचेमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. मौजे हिवरी येथे विकेल ते पिकेल व एक गांव एक वाण या बाबत श्री. एस. आर. पाटील (कृषि सहाय्यक) यांचेमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
मौजे नांदातांडा येथे रासायनिक खत बचत मोहीम व जिल्ह्यात येणाऱ्या विविध पिकांवरील किड व रोग तसेच त्यावरील करावयाच्या उपाययोजना या बाबतचे मार्गदर्शन श्री. के.व्हि.कुमावत (कृषि सहाय्यक) यांचेमार्फत करण्यात आले.
तसेच मौजे सावळदबारा येथील ग्रामपंचायत कार्यालय आवारात रासायनिक खत बचत मोहीम, कृषिक ॲप चा वापर, कृषि विषयक माहिती मिळविण्यासाठी krushi-vibhag.blogspot.com संकेतस्थळाचा वापर, कृषि योजनांची व्हाट्स ॲपवर माहिती मिळविण्यासाठी 8010550870 या मोबाईल क्रमांकाचा वापर करण्याविषयी मार्गदर्शन श्री. ए.एस.महाजन (बी.टी.एम) यांनी मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमांना विविध गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रगतिशील शेतकरी यांची उपस्थिती लाभली.
