Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला कोरोणा योद्धयांचा सन्मान

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

          महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असातांना एरंडोल येथील भेटी दरम्यान त्यांनी एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

      एरंडोल ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या कु.निकिता मानकर व कु.सिमा ननावरे यांनी कोरोना काळात कोरोना रुग्णांसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते " कोरोना योद्धा " म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले.तसेच एरंडोल तालुका ओबीसी तालुका अध्यक्ष म्हणून निपाने येथील श्री.सागर नागराज पाटील यांची निवड करण्यात आली असे आशयाचे पत्र श्री.योगेश महाजन  जळगाव जिल्हा ओबीसी अध्यक्ष यांनी दिले. याप्रसंगी आमदार , प्रणिती शिंदे , आमदार शिरीष चौधरी , माजी खासदार डॉ . उल्हास पाटील , जिल्हाध्यक्ष अँड . संदीप पाटील डॉ फहराज बोहरी , एरंडोल तालुका अध्यक्ष विजय महाजन,शहराध्यक्ष संजय भदाने,युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख इम्रान सैयद,संजय कलाल,मदन भावसार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.