Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचे आंदोलन

Responsive Ad Here

अकोला प्रतिनिधी पंकज शिरसाट

     कोरोना काळात सार्वत्रिक लसीकरण व अन्य अत्यावश्यक कार्यात आपली सेवा देत असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिलावर्गाचे मानधन व अन्य प्रलंबित मागण्यासाठी आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिला वर्गाने राज्यव्यापी आंदोलन प्रारंभ केले आहे. या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी यांना आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आशा वर्कर्स व गट प्रवर्तक संघटना, अकोला वाशिम सीटूच्या वतीने निवेदन देण्यात आले.करोना महामारीच्या काळात आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिलांना रात्रंदिवस कर्तव्य करावे लागत आहे.प्रत्येक घरी जावून रुग्ण तपासणी, रिकॉर्ड ठेवणे, कोरोना लसीकरण मोहीम अंतर्गत शिबिर लावणे आदी काम करावे लागत आहेत. या व्यतिरिक्त शासनाच्या सर्व योजनांच्या सर्वेचे काम आशा व गट पर्यवेक्षिका देण्यात येत आहे. शासनाने या प्रलंबित समस्या त्वरित सोडविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.


                           अशा आहेत मागण्या

- आशा कर्मचारी यांना ३० जून २०२० रोजीच्या पत्रानुसार कोविड-१९ च्या कामाचे माहे ऑगस्ट २०१० पासून ४३३ रुपये रोज या प्रमाणे आदा करण्यात यावे.

- आशा कर्मचारी यांना ४ कामांवर आधारित एकत्रीत माहे ऑगस्ट २०२० पासूनचा मोबदला १६ सप्टेंबर २०१९ शासन निर्णया प्रमाणे ५ तारखेच्या आत अदा करावा.

- आशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामांवर आधारित मोबदला प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत अदा करण्यात यावा. तशी पाचे पावती त्यांना देण्यात यावी.

- आशा कर्मचारी यांनी तयार केलेल्या अहवालाची दुय्यम (ओ.सी) प्रत देण्यात यावी.

- आशा कर्मचारी यांच्या अहवालात त्रुटी असल्यास त्रुटी पूर्ण करण्याकरिता २ दिवसांचा कालावधी देण्यात यावा, यासह इतर मागण्यांचा उपल्लेख करण्यात आला आहे.