अकोला प्रतिनिधी पंकज शिरसाट
विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने मोरगाव भाकरे येथिल ऐन पावसळ्यात विद्युत पुरवठ्याशिवाय मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांमध्ये पन्नासपेक्षा जास्त वेळा वीज गायब होण्याचे प्रकार घडले आहेत. परिसरात कुठेही रिमझिम पावसाला सुरुवात झाली किंवा पाऊस पडणार असे वातावरण झाले तरी या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात येतो. गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये पन्नासपेक्षा जास्त वेळेस विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वारंवार वीज गायब होत असल्यानेनागरिक वैतागले आहेत. लॉकडाऊन काळात व सद्यस्थितीत नागरि भागात कुठेही विद्युत पुरवठा खंडित करू नये, असा आदेश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे.तरीही मात्र किती काळ विद्युत पुरवठा सुरळीत राहतो.
याची नोंद विद्युत मंडळांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा भूमिगत करण्याची मागणी होत आहे. कारण कुठे झाड पडले की, केबल तुटून शॉर्टसर्किट होणे, विद्युत पुरवठा खंडित होणे, असेच प्रकार सर्रासपणे घडत असतात. यातून एखाद्या ठिकाणी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात विद्युत पुरवठा कायम सुरळीत राहावा.
अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.तसेच मोरगाव भाकरे येथील नागरिकांनी सुद्धा आंदोलनाचा इशारा दिला आहे.