गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल येथील महाजन नगर येथे रात्री सफाई कामगार यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घुसून चोरी केली व त्यात सुमारे दोन लाख रुपयांची चोरी केल्याची घटना दि.२५ च्या मध्यरात्री घडली.विशेष म्हणजे घरात सर्व जण होते.तरीही चोरांनी मोठ्या शिताफीने चोरी केल्याचे दिसून येत आहे.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन वरुन मिळालेली माहिती अशी की एरंडोल येथील महाजन नगर येथील भाड्याच्या घरात राहणारे सफाई कामगार सोनु भालेसिंग डींगे हे दि.२५ च्या रात्री ११ वाजता त्यांची पत्नी रिना डिंगे व मुली प्राची व देवांशी यांचे सोबत घराच्या हॉल मध्ये झोपले होते.त्यांनी आपल्या घराचा लोखंडी ग्रिलचा दरवाजाची कडी लावली होती.त्याचा फायदा उचलत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला व सोनु यांनी घर बांधण्यासाठी आणले १ लाख रुपये,सुमारे १२ हजार किंमतीचे दागिने,५ हजार रुपये किमतीचा मोबाईल सुमारे १ लाख १७ हजार किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंबविला.पहाटे ४ वाजता सोनु हे उठले असता त्यांना ग्रीलचा दरवाजा उघडा दिसला व आतील कपाटातील सर्व ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले.अज्ञात चोरट्या विरोधात एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल पंकज पाटील,संदिप पाटील,राजेश पाटील,अनिल पाटील तपास करीत आहेत.