Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ओ.बी.सी.ची जनसंख्यानुसार जनगणना करा या मागणीसाठी-एरंडोल तालुका तेली समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन

Responsive Ad Here

 गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

एरंडोल:- महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जळगाव जिल्ह्याच्या आदेशाने एरंडोल तालुका तेली समाजातर्फे पंतप्रधान, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी जळगाव यांना या निवेदनाच्या माहितीस्तव एरंडोल तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना तेली समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

     एरंडोल तालुका तेली समाज महासभेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना  करून जनसंख्या नुसार आरक्षणाचा कायदा करून ओबीसींना न्याय मिळावा तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ओबीसींच्या राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ओबीसी समाजातील नागरिकांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त झाले असल्यामुळे ओबीसींना न्याय मिळणे जरुरीचे आहे.त्या साठी राज्य शासन व केंद्र शासनाने उचित आयोग अथवा उचित पावले उचलून एका महिन्याच्या आत ओबीसींची जनगणना करावी, ओबीसी जनगणनेनुसार आरक्षणाचा कायदा राज्य व केंद्र सरकारने त्वरित मंजूर करावा, तेली समाजासाठी मागासवर्गीयांना मिळणाऱ्या सवलती लागू कराव्यात, राज्य व केंद्र सरकारने एक महिन्यात उचित आयोग गठीत करून सोय करावी अन्यथा तेली समाज सर्व भीती समाजाला बरोबर घेत" न्याय द्या अन्यथा खुर्च्या खाली करा" अशा स्वरूपाचे आंदोलन रस्त्यावर उतरून केल्याशिवाय राहणार नाही. अशा आशयाचे निवेदन तेली समाजातर्फे देण्यात आले आहे.

    दरम्यान जळगाव जिल्हा तेली समाज युवक आघाडीचे सरचिटणीस संजय चौधरी यांनी ओबीसी आरक्षण, जातिनिहाय जनगणना, जनसंख्या नुसार आरक्षण, आगामी काळात होणाऱ्या आंदोलना विषयी माहिती,तसेच ऑनलाईन मीटिंग याविषयी सविस्तर माहिती दिली.

या वेळी तालुका अध्यक्ष गुलाब दादा चौधरी, तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष रवींद्र भैय्या चौधरी, सचिव आर डी चौधरी भाजपा ओबीसी मोर्चा चे माजी जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, जिल्हा सरचिटणीस संजय चौधरी, नगरसेवक बबलू पैलवान, समाधान चौधरी,नंथु चौधरी, दिनेश चौधरी, कैलास चौधरी, पुरुषोत्तम चौधरी, गणेश चौधरी, अनिल चौधरी, रवींद्र चौधरी, भिकन चौधरी, भूषण चौधरी, गणेश चौधरी, राजेंद्र चौधरी, विश्वनाथ चौधरी, पुरुषोत्तम चौधरी, विलास पाटील, सुनील चौधरी, रामदास चौधरी, राहुल चौधरी, दिलीप चौधरी,मंगेश चौधरी,समाधान चौधरी,अक्षय चौधरी यांचे सह तालुक्यातील तेली समाज बांधव या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी युवक शहर अध्यक्ष रवींद्र चौधरी.आर डी चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.