प्रदिप रघुते प्रतिनिधी येनस
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजा वाटपूर येथे दिनांक 13/06/2021 रोजी सकाळी 11 वाजता सामाजिक वनीकरण विभाग, अमरावती परिक्षेत्र नांदगाव खंडेश्वर यांनी आयोजित केलेल्या रोपे लागवडीच्या कार्यक्रमाचे उदघाट्न मा. ना. श्री. प्रतापदादा अरुणभाऊ अडसड, आमदार धामणगाव रेल्वे मतदारसंघ यांनी केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. रवीभाऊ मुंदे, अमरावती जि. प. सदस्य हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. डी. पी. निकम, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, अमरावती, श्री. एन. सी. गोंडाणे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, अमरावती, श्री. जी. एन. पाटोळे, सहाय्यक वनसंरक्षक, सा. व. वि. अमरावती, श्री. दिलीपभाऊ कापसीकर, वाटपूर ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच , ग्रा. पं. सदस्य, माजी सरपंच, बार्टी संस्थेचे श्री. वानखडे तसेच गावकरी याप्रसंगी उपस्थित होते.
श्री. आशिष मोळेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र नांदगाव खंडेश्वर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सन 2021 यावर्षी नांदगाव खं तालुक्यात मौजा वाटपूर येथे 20 हेक्टर क्षेत्रावर 22220 रोपांची, मौजा लोणी येथे 20 हेक्टर क्षेत्रावर 22220 रोपांची व वाटपूर ते अमरावती जिल्हा सीमेवर 5000 उंच रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रविण सगणे, वनरक्षक यांनी केले. यावेळी वडाच्या रोपाचे वृक्षपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन त्यानंतर कडूनिंब, उंबर, वड, पिंपळ, शिसू या प्रजातीच्या रोपांची मान्यवरांच्या हस्ते लागवड करण्यात आली.
याप्रसंगी बोलतांना मा. ना. प्रतापदादा अडसड यांनी वृक्ष लागवडीच्या गरजेचे महत्व सध्याच्या कोरोना काळात लागणाऱ्या ऑक्सिजन च्या अनुषंगाने व्यक्त केले. सर्व जनतेनी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन जास्तीत जास्त रोपांची लागवड करून त्याचे संरक्षण करावे व रोपे लागवड करणाऱ्या सर्व यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
श्री. डी. पी. निकम, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, अमरावती यांनी सुद्धा याप्रसंगी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. सोमेश्वर घोडमारे, वनपाल व श्री. प्रविण सगणे वनरक्षक तसेच रोपवाटिकेतील मजुर यांनी परिश्रम घेतले

