संजय पवार अमरावती प्रतिनिधी
5 जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गायत्री नर्सरी संचालक श्री क्रांतिकुमार चौधरी यांनी सेव्ह लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्थेला झाडांच्या बियांचे 400 पॉकेट दिले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाचे संतुलन राखून पर्जन्यवृष्टी व मुबलक ऑक्सिजन साठी झाडाचे महत्व पटवून देण्यासाठी व प्रत्येक व्यक्तीने किमान एक झाड लावून त्यांचे संगोपन करावे असे यावेळेस सेव लाईफ फौंडेशन चे संस्थापक अमर कडू पर्यावरण दिनानिमित्त या कार्यक्रमात नागरिकांना संदेश देण्यात आला .
गायत्री नर्सरी चे संचालक श्री क्रांती कुमार चौधरी यांनी 400 झाडांच्या बियांचे पॉकेट चा वापर बाहेर गावी जात असताना रोड च्या बाजुला टाकले तरी अनेक वृक्ष तयार होतात. असे सेव्ह लाईफ फाऊंडेशन व समस्त नागरिकांना संदेश दिला सेव लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक :अमर कडू, सचिव: गौरव नाखले,गोपाल जायभाये, अंकुश उबळे , शेषराव नेमाने,महिंद्र अगष्टी,गोलू मानमोळे,सोनू सोनोने,आनंद इंगोले,भारती भरस्कर,कोमल कडू जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाला सदस्य उपस्थित होते
