प्रतिनिधि हिवरखेड जितेश कारीया
आदर्श व आखिल भारतीय पत्रकार संघ हिवरखेडचा उपक्रम
हिवरखेड :- स्थानिक अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व आदर्श पत्रकार संघ व जिव्हाळा मित्रपरिवार कडून प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड येथे सरपंच सौ सीमाताई संतोष राऊत, ठाणेदार धिरज चव्हाण, वैद्यकीय अधिकारी भराटे, महेंद्र कराळे राजेश पांडव, जितेश कारिया, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांचे पूजन करून रक्तदानाची सुरुवात करण्यात आली. शिबिरात ठाणेदार धिरज चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक विठ्ठल वानी, वैदकीय अधिकारी आनंद भराटे, माजी सरपंच संदिप इंगळे, अध्यक्ष अर्जून खिरोडकार सौ. मोनाली पाटिल यांच्यासह ५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामजिक बांधिलकी जपली.
बि.पी.ठाकरे रक्तपेढी कडून संतोष सुलताने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्त संकलित केले. शिबिरादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिवरखेड शाखेकडून ग्लूकोज चे वाटप करण्यात आले तर कू.साक्षी संजय गिऱ्हे हीच्या वाढदिसानिमित्त शिक्षक संजय गिऱ्हे यांनी रक्तदात्यांना चहा बिस्किट चे वाटप करण्यात आले.
रक्तदात्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज, राहुल गिऱ्हे, पंकज इंगळे, सुरज चौबे, अनिल कवळकार, विकास गुप्ता, अभिजीत मोरोकार, आशिष गिऱ्हे, दिनेश शर्मा, विशाल गिल्ले, अजिंक्य कराळे, सागर खारोडे, नितीन आमले, तुषार गावंडे, नयन खाडे, अक्षय भड, नितीन वानखडे, निलेश खंडारे, प्रवीण गवळी, मंगेश साबळे, योगेश कतोरे, पियुष राऊत, दिपक वानखडे, पंकज राठी, अमोल निंबोकार, आशिष नाठे, संकेत राऊत, आशिष सदानी, अमोल भोंगाळे, सुनील सोळंके, शुभम कोकाटे, जितेश बागळकर, शैलेश जायले, श्याम काळे, आसिफ सौदागर, सुभाष ठाकरे, प्रणव ढोकणे, सागर देशमुख, धनराज बोदळे, अमोल बाजारे, अंकेश भांबुरकर, मनोज जोगे, महिंद्रा ठाकरे, शुभम म्हसाळ, नागेश इंगळे, धनंजय गावंडे, रवी भोयर या ५३ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामजिक बांधीलकी जपली. रक्तदान शिबिरासाठी राहुल गिऱ्हे, पंकज इंगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पोलिस कर्मचारी,आरोग्य विभागाचे कर्मचारी व पत्रकार संघाच्या सदस्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी संतोष रामकृष्ण राऊत, उमर बेग मिर्झा, निखिल भड, गौतम इंगळे, ओम गावंडे, गजानन धुरदेव, विशाल गिऱ्हे, इत्यादी उपस्थित होते.

