जळगाव प्रतिनिधी
चोपडा गेल्या नऊ दिवसापासून महाराष्ट्र राज्यातील आशा व गट प्रवर्तक या सं प लढा एकजुटीने लढल्या त्यामुळे आशा यांच्या मानधनात निश्चित मानधनात१०००₹ रुपये व भत्यात पाचशे रुपये आणि गटप्रवर्तक यांनाही एकूण १७००/₹ वाढ मंजूर झाली आशांचे कुटुंबीयांना मोफत इलाज सुविधा तसेच संपात सहभागी वर कारवाई होणार नाही आदी निर्णय आशा व गट प्रवर्तक कर्मचारी कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री व अधिकारी यांच्या ४ थ्या/५ व्या फेरीच्या चर्चेतून निघाला .
हा लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संघर्षाचे फलित आहे म्हणून जिल्ह्यातील चोपडा, यावल, भुसावळ जळगाव धरणगाव आदी तालुक्यात प्रत्यक्ष संघर्षात उतरणाऱ्या आशांना व इमानदारीने साथ देणाऱ्या जिल्यातील गतप्रवर्टक यांनाही धन्यवाद ...!!! देणारे पत्रक जळगाव जिल्हा आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना आय टक चे अध्यक्ष अमृत महाजन सुलोचना साबळे मिनोक्षी सोनवणे, प्रतिभा पाटील ,मनीषा बैरागी जहिरा बी निषाद फारुकी, आशा पाटील, मनीषा वारुळकर पल्लवी सोनवणे नूतन वाघ शालिनी पाटील वनिता मोरे शारदा महाजनआरती कापूर जोती सोनवणे गतप्रवर्तक प्रतिनिधी, छाया मोरे, सुनीता ठाकरे ,अस्मा गवळी,कल्पना सरोदे सरला माळी आदींनी महाराष्ट्र शासन व कृती समितीचे नेते एम ए पाटील राजू देसले शंकर पुजारी डी एल कराड सुमन पुजारी आदीचे आभार मानले आहेत .
लवकरच कृती समितीतर्फे जिल्ह्यात विजयी मेळावा घेनार आहोत.असेही आय टक काढलेल्या पत्रकात म्हटले आहे