Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मायनॉरिटी फेडरेशन व भारतीय कम्युनिस्ट पार्टी तर्फे रेशन प्रश्र्नी आंदोलनाचा इशारा!

Responsive Ad Here

   प्रतिनिधी चोपडा

          चोपडा तालुका व शहरातील रेशन व्यवस्था सुधारली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पार्टी महिंद्राची फॅशन माइनॉरिटी फेडरेशन तर्फे चोपडा तहसील कार्यालयाला देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे, याबाबत सविस्तर असे की ,चोपडा शहरात कोरोना लॉकडाऊन काळात रेशन दुकानदार मनमानी करत असून लोकांना शासनाने दिलेल्या कोठ्या प्रमाणे व नियमाप्रमाणे रेशन देत नाहीत

एखाद्याचा अंगठा उमटला नाही तर  त्यांना रेशन देत नाहीत. रेशन कार्ड वर जेवढे नाव आहेत ..तेवढ्या प्रमाणात रेशन मिळत नाही. रेशन कमी का मिळते ?असे विचारणा केल्यास उद्दामपणे उत्तर देतात . तुम्हाला जे करावयाचे ते करा असे बोलतात. 

 कोरोना साथ  काळात लोकडाऊन मुळे लोकांना त्यांच्या हक्कासाठी मोर्चा व आंदोलने करण्याचा अधिकार नसल्यामुळे रेशन दुकानदार गैरफायदा घेत आहेत.असा आरोप चोपडा तहसीलदार यांना देणेत आलेल्या निवेदनात देणेत आला आहे एपीएल धारकांनाही धान्य मिळत नाही..  कोटा किती आला? त्याची माहिती दिली लिहिली जात नाही  तरी शहरातील रेशन दुकानांचा व्यवहार हा पारदर्शी करावा.त्यांची एकदा कार्यालयीन मीटिंग बोलवून नियमावलीची उजळणी करून द्यावी 

१)पुरवठा  कार्यालयात रेशन कार्ड नाव वाढवणे. रेशन कार्डतून नाव कमी करणे.. बदलून देणे.. संपलेले कार्ड बदलून देणे.. नावे दुरुस्ती करणे व मागेल त्याला रेशन कार्ड मिळावे  सर्व व्यवहार जनतेला  त्रासदायक ठरणार नाहीत अशा तऱ्हेने नियोजन व्हावे  हरभरा दाळ देण्यात आली आहे तसेच मका लोकांच्या माथी मारला जात आहेते बंद करा

२) रेशन दुकानदार व  स्थानिक प्रतिनिधी यांची मिटिंग व्हावी व दुकानानचा कारभार पारदर्शी करावा

३). रेशन दुकानातून चांगले धान्य मिळावे. हरभरा दाळ चांगली मिळावी   तेल साखर तूरडाळ रवा मैदा आटा,  जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात

४ ) रेशन व्यवस्थेचे रोखीकरण करू नये. 

५)प्रत्येक रेशन दुकानात तक्रार पुस्तक ठेवावे

६) चोपडा तालुक्यातील व शहरातील गरजू गरिबांना अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत योजनेत समावेश व्हावा

७) पंधरा दिवस लोक डाऊन वाढल्यामुळे शहरातील आदिवासी भटके-विमुक्त व बारा बलुतेदार ..यांना धान्य देण्याची व्यवस्था करावी. वरील मागण्यांबाबत कार्यवाही करावी व न केल्यास पुढील काळात या विषयावर आंदोलनाचा इशारा

देण्यात आला आहे या पवार निवेदनावर लालबावटा शेतमजूर युनियनचे राष्ट्रीय कमिटी नंबर अमृत महाजन मायनॉरिटी फेडरेशनचे अध्यक्ष शेख साजिद टेलर सचिव शेख नासीर  तसेच हिराबाई सोनवणे ,नंदाबाई चौधरी, रत्‍नाबाई पाटील रत्ना भील यमुना भील लता भील,संजू पारधी ,कॉम्रेड शांताराम पाटील कॉम्रेड छोटू पाटील मेहमूद मोहियोड्डीन   ,गणेश महाजन यूनुस बागवान फिरोज खान .शेख अन्वर बेग ,अश्फाक अली आदी १५ /२०जणांचा समावेश इश्क मंडळात समावेश होता होता