संदीप म्हस्के प्रतिनिधी देऊळगावराजा
नगरपरिषद सिंदखेड राजा कोरोना मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाचा एक वर्षाचा घर टॅक्स व नळ टॅक्स नगरपालिकेने माफ करावा.असे निवेदन सिद्धार्थ जाधव यांनी नगर परिषद सिंदखेड राजा ला दिले.
निवेदनात अशी मागणी आहे की मागील वर्षापासून करोना या वैश्विक महामारी मुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत उघड्यावर आली आहेत लॉकडाउन मुळे अनेक लोकांची व्यवसाय, रोजगार बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला आपल्या मदतीची गरज आहे आपल्या शहरांमधील एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा जर कोरोना या आजारामुळे मृत्यू झाला असेल त्या कुटुंबास एक वर्षाचा घरटॅक्स व नळ टॅक्स माफ करावा व त्यांना या काळात दिलासा द्यावा.सिद्धार्थ जाधव शहराध्यक्ष, उल्हास भुसारे कार्याध्यक्ष, कदीर कुरेशी,अमोल ठाकरे, संजय चौधरी आदी उपस्थित होते.
