Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चोपडा काँग्रेसतर्फे नानासाहेब पटोले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

Responsive Ad Here

  प्रतिनिधी चोपडा

          चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लोकनेते नानासाहेब  पटोले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. हार-तुरे यांना फाटा देत जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष एड. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नानासाहेब पटोले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. गरजू आणि गरीब कुटुंबांना प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन , त्यांना गहू व तांदूळ काँग्रेस पक्षातर्फे वाटप करण्यात आले. दि. 5 जून 2021 रोजी आदिवासी व अनेक निराधार कुटुंबांना प्रत्येकी पाच किलो गहू व तीन किलो तांदूळ देण्यात आला. 

      यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्री अजाबराव पाटील, चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष के .डी .चौधरी सर, चोपडा तालुका समन्वयक व मार्केट कमिटीचे माजी उपसभापती श्री नंदकिशोर सांगोरे, नगरपालिका आरोग्य सभापती सौ सुप्रिया सनेर, प्राध्या. श्री कांतीलाल सनेर, एन. एस. यु .आय.राज्य सचिव श्री चेतन बाविस्कर, एन एस यु आय शहराध्यक्ष हर्षवर्धन पवार सतीश बागुल लतीश बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मास वाटप करण्यात आले. त्यानंतर श्रीराम नगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले .वृक्षारोपण करताना चोपडा शहराध्यक्ष के.डी.चौधरी  एन एस यु आय राज्य सचिव चेतन बाविस्कर चोपडा शहर एन एस यु आय अध्यक्ष हर्षवर्धन पवार सतीश बागुलआदी मान्यवरांनी वृक्षारोपण केले .छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो, राहुल गांधी जिंदाबाद ,नानासाहेब पटोले जिंदाबाद ,एडवोकेट संदीप भैय्या पाटील जिंदाबाद अशा घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोष करून, जय जवान जय किसान अशा घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.