गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
मुंबई येथुन मा. शिवसेना पक्षप्रमुख मा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे* याच्या आदेशानुसार, मा. उत्तर महाराष्ट्र संम्पर्क नेते खा. संजय राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच शिवसेना सचिव खा. अनिलजी देसाई, समन्वयक रविन्द्र मिर्लेकर, जळगांव जिल्हा संम्पर्क प्रमुख मा. संजयजी सावंत यांच्या सूचनेनुसार, जळगांव लोकसभा सहसंपर्क प्रमुख म्हणून गुलाबरावजी वाघ यांची नुकतीच बडतीचा पदावर नियुक्ती करण्यात आली.
त्या निमित्त धरणगांव येथे गुलाबरावजी वाघ यांच्या शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील यांनी कार्यकर्त्यां समवेत शिवसेना एरंडोल तालुक्याचा तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रसंगी एरंडोल तालुका प्रमुख वासुदेव पाटील, शिवसेना शहर प्रमुख भैय्या महाजन, युवासेना तालुका युवाधिकारी बबलु पाटील, नगरसेवक आरती अतुल महाजन, शिवसैनिक कृणाल पाटील, मोहन महाजन एरंडोल हे उपस्थित होते . याप्रसंगी वासुदेव पाटील यांनी शिवसेना संघटना बांधणीसाठी आपण मला सहकार्य करा असा आशावाद व्यक्त केला. गुलाबरावजी वाघ यांनी सांगितले की, मी जिल्हा प्रमुख म्हणून ऐवढे वर्षे काम केले त्याचा पक्ष बांधणीसाठी पुढील काळात गांव तेथे शिवसेना व घर तेथे शिवसैनिक हि संकल्पना जळगांव लोकसभा मतदारसंघात राबवणार असल्याचे गुलाबराव वाघ यांनी म्हटलं.
