Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जिल्हाभरातील शाळा महाविद्यालय यांना विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचे आदेश देण्यात यावे भाजपा विद्यार्थी आघाडी यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन

Responsive Ad Here

 देवानंद नेमाने प्रतिनिधी नांदुरा

    नांदुरा:- सध्या जगभरात कोरोना महामारी ने थैमान घातलेला आहे.मागील दीड वर्ष झाली कोरोना मुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झालेले आहेत.अशा परिस्थिती सर्वसामान्य नागरिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल झालेला आहे.त्यामुळे अनेक परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे.कोरोना महामारीमुळे दीड वर्ष झालीत शाळा कॉलेज बंद आहेत.त्याचप्रमाणे महाविद्यालयात वाचनालय,जलतरण तलाव,सायकल स्टँड सर्व बंद आहेत.परंतु महामारीच्या काळात अनेक महाविद्यालय प्रायव्हेट शाळा यांनी विद्यार्थांना फी भरण्यासाठी तकादा लावला आहे.यात उदरनिर्वाह साठी कष्ट घ्यावे लागत असतांना ते शाळा महाविद्यालयाची फी कुठून भरणार,त्यामुळे अनेकांवर शाळा महाविद्यालय सोडायची वेळ येऊ शकते,अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. 

   या सर्व कारणांमुळे आज दिनांक १० जून २०२१ वार गुरुवार ला भाजपा विद्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष पवनभाऊ गरड यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हा भाजपा विद्यार्थी आघाडी ने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व जिल्हाधिकारी यांनी एक दौरा करावा अशी सुद्धा मागणी केली असता त्यांनी सकारात्मक भावनेने यावर विचार करतो असे सांगितले.यावेळी भाजपा विद्यार्थी आघाडी चे जिल्हा सरचिटणीस जितू मोरे,आशिष सुरेखा, ऋषिकेश नालिंदे, वैभव अढाव ,ऋषिकेश देशमुख,आदित्य उदयकर तसेच भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पवन ठाकूर,विजय दिवाने, नितीन काळे,आकाश काळे ,मोहन रावनकर ,सागर जैस्वाल ,चेतन पाटील,आकाश लटके ,रितेश अग्रवाल व इतर भाजपा विद्यार्थी आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.