Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा विभाग हिवरखेड तर्फे कोरोना युद्धांना ग्लुकोन डी वितरण

Responsive Ad Here

  हिवरखेड प्रतिनिधी   जितेश कारीया

    रा. स्व. संघ  सेवा विभाग अंतर्गत नेहमी  समाजासाठी सेवा कार्य राबविल्या जातात. कोरोनाच्या  या काळात  कोरोना योद्धांची व  नागरिकांची सेवा घडावी या हेतूने गरजवंतांना शक्तिवर्धक ग्लुकोन डी  चे वितरण रविवार 20 जून 2021  रोजी हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हिवरखेड तसेच आदर्श पत्रकार संघ हिवरखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने येथे रक्तदान शिबिर आयोजित केले असता या ठिकाणी एकूण 53 रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यामध्ये बहुतांश राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या स्वयंसेवकांनी रक्तदान केले तसेच  रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना  व उपस्थित मान्यवरांना ग्लुकोन डी चे वाटप केले त्याच बरोबर इंदिरानगर वस्ती मध्ये ग्लुकोन डी चे वितरण करण्यात आले व खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याकरिता व तसेच त्यांचा उत्साह 

  वाढावा म्हणून जगद्गुरु प्रतिष्ठान कबड्डी संघ च्या सर्व खेळाडूंना ग्लुकोन डी चे वाटप करण्यात आले यानंतर हिवरखेड पोलीस स्टेशन येथे सर्व कर्मचाऱ्यांना ग्लुकोन डीचे वाटप करण्यात आले यावेळी ठाणेदार धीरज दत्तात्रेय चव्हाण उपस्थित होते  सफाई कर्मचारी महिला व पुरुष यांना हिवरखेड येथील सर्व स्वयंसेवक यांच्या उपस्थित गरजू नागरिकांना  ग्लुकोन डी चे स्वयंसेवक कडून  वितरण तालुका संघचालक  माधवराव बनकर,कार्यवाह प्रवीण उजाळ ,सहकार्यवाह  संजय हागे, हरिभाऊ  चुंगळे यांच्या मार्गदर्शनात  राबविण्यात आले.यावेळी हिवरखेड शाखेचे तालुका पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.