संजय पवार अमरावती प्रतिनिधी
रमेश बामनकर रा. शारदा नगर, बस डेपोच्या मागे, बडनेरा यांना 2 वर्षा पासून पॅरेलिसिस झाला असून व त्यांचे घर पावसामुळे घर सुध्दा पडले आहे.घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने सेव्ह लाईफ फाऊंडेशन चे सदस्यांनी त्यांच्या घरी जाऊ त्यांना मदतीचा आश्वासन दिले होते 6 जूनला सेव्ह लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्थांनी
10,000 रु रोख रक्कम आणि 20 बल्ली 2 तडव एवढी मदत करण्यात आली. व त्यांना घर बांधण्यात हातभार लावला सेव्ह लाईफ फाऊंडेशन चे संस्थापक श्री अमर कडू सचिव गौरव नाखले कोषाध्यक्ष सचिन कडू पराग नरसेकर धीरज जिरापुरे विषाल कडू गोपाल जायभाये शेषराव नेमाने विजयालक्ष्मी यादव कोमल कडू इत्यादी संस्थेचे पदाधिकारी हजर होते
