गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल शहरात गेल्या 2016 पासून योग दिवस साजरा होत आहे.सतत सहा वर्षापासून हा कार्यक्रम सादर करत असलेले योगतज्ञ किशोर सोनार यांचा एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तुषार देवरे, पी.एस.आय.आविनाश दहिफळे, संदीप सातपुते,सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील ,गणेश वाणी, मधुकर बोरसे ,निलेश मराठे, नितीन बोरसे,अरुण साळी,रामभाऊ गांगुर्डे यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला एका छोटे खानी कार्यक्रमात केला तसेच
माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील ,एरंडोल नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी पी.डी.सोनवणे, जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक विनोद देशमुख, डॉ. एस.टी. पाटील,प्रा.वा.ना. आंधळे, एड. विलास मोरे, कवी निंबा बडगुजर, प्रा. पांडे सर, दत्तात्रय देशमुख, सुनील बागड यासह अनेक व्यक्तींनी फोनवरून योग दिवसाच्या योगतज्ञ किशोर सोनार यांना शुभेच्छा दिल्या.
