नाशिक येवला प्रतिनिधी माधव नेहे
सायगाव ता येवला येथील गरीब कुटुंब बाळू किसन गाडेकर यांच्या घराचे जळीत होऊन त्यांचा संपूर्ण संसार जळून खाक झाला. मजुरी तसेच शेतीकाम करून उदरनिर्वाह करणारे हे दांपत्य अतिशय निराधार आहे. रामनाथ व बाळू गाडेकर हे दोघे सख्खे भाऊ मानसिक दृष्ट्या अपंग आहेत. त्यांचे कुटुंब चालवण्याचे काम या दोघांच्या पत्नी करत आहेत. कष्ठाने उभ्या केलेल्या घराला रात्री झोपेत असतांना आग लागली.
वेळीच सावध झाल्याने बाळू, त्यांची पत्नी व मुलगा यांनी आपले जीव वाचवले पण काष्ठाने उभा केलेला संसार यात भांडे, कपडे, धान्य जाळून खाक झाले . संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले.हिबाब ग्रामस्थांनी प्रसार माध्यमांवर टाकल्याने माहिती कुणाल दराडे यांना मिळताच त्यांनी या कुटुंबाची भेट घेतली. या कुटुंबाला त्यांनी जागेवर आर्थिक मदत देऊन सहानुभूती दिली तसेच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती व कर्त्या पुरुषांचे अपंगत्व बघता त्यांना अजून मदतीची गरज असल्याचे कुणाल भाऊ
दराडे म्हणाले. त्यासाठी शासन स्तरावरील जि काही मदत करता येईल ती करणार असल्याचे सांगितले तसेच संजय गांधी निराधार योजनेचा देखील या अपंग निराधार कुटुंबाला कसा लाभ मिळवून देता येईल हे देखील पाहू असेही कुणाल भाऊ म्हणाले.
यावेळी माजी कृषी अधिकारी अशोक कुळधर साहेब, देविदास जानराव सर, युवा शिवसेना तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर उशीर, उपसरपंच गणेश माळी, ग्रा पं सदस्य दीपक खैरनार, भाऊसाहेब अहिरे, सहाय्यक प्रशांत जाधव, संदीप चव्हाण, गणेश देवरे, अतुल भालेराव, शिवाजी भालेराव, सोमनाथ ढाकणे, मंगेश निघुट, किरण गाडेकर, माधव भालेराव, विठ्ठल आहेर, प्रवीण गाडेकर, मनोज देवरे, आदींसह सायगाव व पांजरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

